लाडकी बहिणी योजना, या महिलांना मिळणार 1500 ऐवजी 4500 रुपये पर्यंत रक्कम! यादीमध्ये नाव बघा

ladki bahin yojana new update: तर राज्यातील जवळपास सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्या महिलांनी या योजनेच्या सुरुवातीच्या दिवसात अर्ज केला होता, त्यांना रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सरकारकडून 3000 रुपयांचा हप्ता मिळाला होता. आता सरकार या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचा लाभ देणार आहे आणि या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने तिसऱ्या हप्त्याबाबत लाभार्थी यादीसुद्धा जाहीर केली आहे. यासोबतच महिलांना तिसरा हप्ता कधी मिळणार याची देखील महाराष्ट्र सरकारने सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्ही यादीमध्ये तुमचे नाव तपासायला हवे.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत ज्या महिलांचे नाव असतील, त्यांना तिसऱ्या हप्त्यात 1500 ते 4500 रुपये दिले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची यादी कशी बघायची यासंबंधीत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणूनच हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Ladki Bahin Yojana 3rd Kist List Out Overview

माहितीतपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
सहाय्य रक्कम₹1500 प्रति महिना
हप्ता क्रमांकतिसरा हप्ता
हप्ता उपलब्धता30 सप्टेंबर पर्यंत
यादी तपासणीऑनलाइन/ऑफलाइन
हेल्पलाइन क्रमांक181
अधिकृत वेबसाइटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
ladki bahin yojana new update

Ladki Bahin Yojana 3rd Kist List Out In Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे. सरकारने याबाबतची यादीही जाहीर केली आहे. सरकारने सांगितले आहे की तिसरा हप्ता 15 सप्टेंबरपूर्वी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार होता. मात्र, लाखो महिलांना अद्यापही हा हप्ता मिळाला नाही.

ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नुकतेच अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले असतील, तर त्यांनाही लवकरच तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज सादर केला आहे, त्यांनाही लवकरच तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana 3rd Kist New Update In Marathi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता लवकरच सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. याबाबतची माहिती सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर (X) सातत्याने शेअर केली जात आहे.

या योजनेच्या अपार यशावर सरकारने समाधान व्यक्त केले असून, ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बँकांसमोर रांगा लावण्याची गरज नाही. सर्व पात्र महिलांना ही योजना लाभदायक ठरणार आहे. एकदा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम स्वयंचलितपणे जमा केली जाईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?

महाराष्ट्रातील लाखो महिला ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, अशा महिला तिसऱ्या हप्त्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकारने आधी सांगितले होते की तिसऱ्या हप्त्याची रक्कम 15 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. परंतु, आता सर्व महिलांचे पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच सरकार 30 सप्टेंबरपर्यंत तिसऱ्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे.

ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते आधीच मिळाले आहेत, त्यांना पंधराशे रुपये मिळतील आणि ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना एकूण 4500 रुपये दिले जातील.

मुलींना मिळणार आता १ लाख रुपये, थेट रक्कम बँक खात्यामध्ये आताच अर्ज करा!

Majhi Ladki Bahin Yojana List Out In Marathi

तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी या योजनेची जाहीर झालेली यादी तपासावी लागेल. तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेची यादी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तपासू शकता. ऑनलाइन यादी तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या (किंवा संबंधित संस्थेच्या) वेबसाईटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटला भेट दिल्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने यादी तपासू शकता.

याशिवाय, तुम्हाला जर ऑफलाइन पद्धतीने यादी तपासायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील किंवा शहरातील महानगरपालिका/ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल. तेथून तुम्ही लाभार्थी महिलांची यादी तपासू शकता आणि यादीमध्ये तुमचे नाव अगदी सहजपणे शोधू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Eligibility

तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल आणि तुम्हालाही या योजनेअंतर्गत मिळणारे पंधराशे रुपये दर महिन्याला हवे असतील तर तुम्हाला या योजनेची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच, या योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे हेही आपण आता जाणून घेणार आहोत. तर बघा, सर्वात आधी महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

सरकारने असे सांगितले आहे की 30 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा केली जाईल. मात्र, ज्या महिलांचे अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर केले आहेत त्यांनाच या तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

माझी लाडकी बहिन योजना अर्ज कसा करावा

सरकारने जाहीर केले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ, महिला आता 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी नवीन अर्ज करू शकतात. मूलतः, या योजनेसाठी अर्ज जुलै महिन्यात सुरू झाले होते आणि 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख ठरवण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे ही मुदत वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली आहे.

याचा अर्थ, तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. 30 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा जवळच्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीने ऑफलाइन अर्ज भरू शकता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनायेथे क्लिक करा
सर्व सरकारी योजनांची माहिती मिळवायेथे क्लिक करा
ladki bahin yojana new update
admin
admin

मी कृषी क्षेत्राशी संबंधित एक माहितीपूर्ण संसाधन आहे. माझा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत शेतीच्या जुन्या आणि आधुनिक पद्धती, नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोहोचवणे हा आहे. मी तुम्हाला शेतीविषयक सर्व माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो.

Articles: 42

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *