महिलांसाठी 4 जबरदस्त योजना, दरमहा मिळतील 1500 ते 1 लाख रुपये! Best Government Schemes Women

Best Government Schemes Women: नमस्कार! केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून महिलांसाठी दरवेळेस नवीन नवीन योजना सुरू करण्यात येतात. तर अशाच पैकी पाच जबरदस्त योजना इतक्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. या योजना अंतर्गत महिलांना आर्थिक लाभ मिळतो तसेच शिक्षणात देखील लाभ मिळतो. यासोबतच केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून महिलांना या पाच योजनांन अंतर्गत 1500 रुपये ते 1 लाखापर्यंत रक्कम दिली जाते, जे की थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये येते. तर काय आहेत या योजना आणि तुम्ही या योजनांचा कसा लाभ घेऊ शकता याची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

तर, इतक्यात केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन योजनांचा तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. या लेखांमध्ये आपण या योजना संबंधित सविस्तर माहिती घेणार आहोत. यासोबतच, या योजनांचा अर्ज कसा करायचा, अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे, यासोबतच वयोमर्यादा काय आहे, या योजनांमध्ये लाभ काय मिळतो याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

Best Government Schemes Women
Best Government Schemes Women

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

तर, सर्वात पहिली आणि महत्त्वाची योजना आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. ही योजना महिलांसाठी महाराष्ट्र सरकार अंतर्गत सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात, जे डीबीटी मार्फत त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केले जातात. पण, सरकारने असे सांगितले आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही महाराष्ट्रात राहणारी असावी, तसेच महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असणे आवश्यक आहे. यासोबतच सरकारने दिलेल्या सर्व निकषांचे पालन महिलेने करायला हवे. तरच महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चा लाभ घेऊ शकते.

तर, आता तुम्हाला देखील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चा लाभ घ्यायचा असेल, तर याबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी मदत देण्याकरिता ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, मुलगी १८ वर्षांची झाल्या वर, तिच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून ७५ हजार रुपयांची रक्कम दिली जाते, जी मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करते. पण सरकारने असे सांगितले आहे की या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर मुलगी हे कायमस्वरूपी महाराष्ट्राची रहिवासी असावे आवश्यक आहे, तसेच महाराष्ट्रातच जन्मलेली असावी. मुलीकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे, तरच ते या योजनेसाठी पात्र ठरेल. यासोबतच ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ 18 वर्षांपर्यंतच्या मुली घेऊ शकतात.

तर, आता तुम्हाला देखील ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ घेऊन तुमच्या मुलीचे शिक्षण पूर्ण करायचे असेल, तर तुम्हाला या योजने संदर्भात अधिक सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. तर येथे क्लिक करून तुम्ही आणखी सविस्तर माहिती घेऊ शकता, जेणेकरून सरकारकडून तुम्हाला ७५ हजार रुपयांची रक्कम तुमच्या मुलीच्या शिक्षणाकरिता प्रदान करण्यात येईल.

सुकन्या समृद्धी योजना

तर, या पाच योजनांमधील तिसरी आणि महत्त्वाची योजना जी केंद्र सरकारने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरू केली. या योजनेचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. जर तुमच्या घरात देखील मुलीचा जन्म झाला आणि तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी असेल, तर आता तुम्हाला तिच्या लग्नाची काळजी करण्याची काही गरज नाही, कारण मुलीच्या शिक्षणाचा खर्च तसेच तिच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली.

तुम्हाला देखील आता सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्या आधीच तुम्हाला बँक खाते उघडावे लागेल. हे बँक खाते पोस्ट पेमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये तुम्ही उघडू शकता. या बँक खात्यामध्ये मुलीचे पालक दरवर्षी 250 ते 1.50 लाखापर्यंत रक्कम जमा करू शकतात. हे रक्कम जमा केल्यावर सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत या रकमेवर विशेष प्रकारचे व्याज दिले जाते. जेणेकरून या रकमेमध्ये वाढ होऊन ती मुलीच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नासाठी कामात येते.

या योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब कुटुंबातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली. योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पाच सदस्य असलेल्या प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी तीन एलपीजी गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जातात. २०२४-२५ आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ ५२ लाख गरीब कुटुंबांना मिळेल असे सरकारने स्पष्ट केले आणि त्यांना दरवर्षी तीन एलपीजी गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले जातील.

तर आता तुम्हाला देखील या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.

महिला सन्मान बचत पत्र योजना

केंद्र सरकार मार्फत महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आर्थिक बचतीला प्रोत्साहन देणारी योजना सुरू करण्यात आली. योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. या योजनेअंतर्गत महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून पैशांची गुंतवणूक करता येते. या योजनेद्वारे महिला एक हजार ते दोन लाखांपर्यंतची रक्कम जमा करू शकते, ज्यावरती पोस्ट ऑफिसद्वारे महिलेला ७.५ टक्के प्रति वर्ष व्याज मिळते. तर आता तुम्ही देखील महिला असाल आणि तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर, तुम्ही सर्वात आधी भारत देशातील महिला असणे आवश्यक आहे. यासोबतच तुमचे वार्षिक उत्पन्न सात लाखांपेक्षा कमी असावे. सरकारने असे सांगितले आहे की, या योजनेसाठी किशोरवयीन मुली ते ज्येष्ठ नागरिक या वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.

तर आता तुम्हाला देखील या योजनेचा अर्ज करायचा असेल तर, अधिक सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत गोरगरीब महिलांसाठी खूप योजना राबवल्या जातात. त्यापैकी या पाच योजना आहेत. यामध्ये तुम्हाला शिक्षणासाठी लाभ मिळतो आणि आर्थिक लाभ देखील मिळतो. आता तुम्हाला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना किंवा महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना यापैकी कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अगदी भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. हा लेख जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण शिक्षणामध्ये आणि वैयक्तिक खर्चामध्ये आर्थिक मदत होईल.

घरी बसून मिळतील दरमहा ₹ 9,250 रुपये! लगेच अर्ज करा

Rahul
Rahul

नमस्कार! मी राहुल आहे. मी माझे इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे आणि मला भारत सरकारच्या नवीन सरकारी योजनांबद्दल माहिती घेण्याची विशेष आवड आहे. या माहितीचा उपयोग करून, मी तुम्हाला "शेती खजाना" द्वारे भारत सरकारच्या विविध सरकारी योजनांबद्दल सविस्तर माहिती देतो. तसेच, तुम्हाला सरकारी योजनांशी संबंधित अधिक सविस्तर माहितीसाठी, तुम्ही माझे सोशल मीडिया अकाउंट फॉलो करू शकता.

Articles: 34

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *