इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू (IOCL Recruitment 2024)

IOCL Recruitment: बऱ्याच पदवीधर विद्यार्थ्यांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता उमेदवारांची ही इच्छा पूर्ण होणार आहे कारण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सध्या विविध शिकाऊ पदवीधर अभियंता पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या लेखाद्वारे आपण या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, अर्ज प्रक्रिया आणि निकष याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत.

Indian Oil Corporation Limited Vacancies In Marathi

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे केमिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलिजी, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनियर, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, मेटलर्जिकल इंजिनियर या सर्व रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात येत आहे. या भरतीसाठी पगार, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

IOCL Recruitment
IOCL Recruitment
घटकतपशील
जाहिरात क्रमांकDP/5/5/Open (GATE 2024)
जाहिरात तारीख11 जून, 2024
पदाचे नावअभियंते/अधिकारी आणि पदवीधर अप्रेंटिस अभियंते (GAEs)
पात्रताGATE-2024 मधून खालील शाखांमध्ये उत्तीर्ण: रासायनिक, नागरी, संगणक विज्ञान, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, यांत्रिक, धातुकर्म अभियांत्रिकी
वयोमर्यादा सामान्य/EWS: 26 वर्षे, OBC: 29 वर्षे, SC/ST: 31 वर्षे
शैक्षणिक पात्रतासंबंधित शाखेतून पूर्णवेळ B.Tech/BE किंवा समतुल्य
किमान गुणसामान्य/OBC: 65%, SC/ST/PwBD: 55%
अर्ज पद्धतऑनलाइन (www.iocl.com)
शुल्ककोणतेही शुल्क नाही
शारीरिक फिटनेसPEME मार्गदर्शक तत्त्वांनुसार
आरक्षणOBC(NCL)/SC/ST/EWS आणि PwBD साठी लागू
महत्त्वाच्या तारखाअर्ज प्रक्रिया सुरू: 11 जून, 2024
Indian Oil Corporation Limited Vacancies

Indian Oil Corporation Limited Educational Qualification In Marathi

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकर भरती चा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पूर्णवेळ B.Tech/BE किंवा समतुल्य पदवी AICTE/UGC मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेत असणे आवश्यक आहे.

Indian Oil Corporation Limited Job Payment In Marathi

तुम्ही जर इंडियन ऑइल ऑपरेशन लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि तुमची निवड शिकाऊ पदवीधर इंजिनिअर पदासाठी झाली तर तुम्हाला सुरुवातीला दरमहा ५० हजार रुपये पगार मिळेल. म्हणून, लवकरच या पदासाठी अर्ज करा. अर्ज प्रक्रिया खाली दिलेल्या परिच्छेदात दिली आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करा, सरकार देणार 50% सबसिडी! 

IOCL Recruitment 2024 : Application Process In Marathi

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये शिकावू पदवीधर अभियंते या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 21 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज पाठवण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज योग्य रीतीने भरला आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी नोकरीचा अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2024 जाहीर केली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत निघालेल्या नोकरी भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तुम्ही नोकरीची अधिसूचना वाचू शकता, ज्यामध्ये वेबसाइट आणि अधिसूचना सविस्तर दिली आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात PDF बघायेथे क्लिक करा
नोकरी संबंधित सविस्तर माहिती मिळवायेथे क्लिक करा
IOCL Recruitment 2024

पोस्ट ऑफिस योजना, दोन वर्षात मिळवा 2 लाख 32 हजार रुपये! सविस्तर वाचा

Sanket
Sanket

नमस्कार, मी संकेत आहे. माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि मला कंटेंट रायटिंगची खूप आवड आहे. मी तुम्हाला "शेती खजाना" द्वारे सरकारी आणि खाजगी नोकरींबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तसेच, नोकरीसंबंधी सर्व माहितीसाठी तुम्ही माझ्या सोशल मीडिया खात्यांना फॉलो करू शकता.

Articles: 7

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *